मुंबई – महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करावे. सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या पावनखिंड चित्रपटालाही करमुक्त करावे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र विरोधक या मुद्द्यावर न बोलता, भलत्याच विषयाकडे राज्याचे लक्ष वळवत आहेत, अशी टीका आमदार अतुल बेनके यांनी केली.
काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन भाजपने अनेक मुद्दे मांडले आहेत. या चित्रपटाचे शो वाढवावेत तसेच या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर अतुल बेनके यांनी देखील आपली मागणी पुढे मांडली.