बाधितांपैकी एक रूग्ण शिरूरमधील जोशीवाडीतील तर दुसरा मुंबईचा….
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहरात मुंबई वरून आलेल्या एका नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह व शहरातील एका वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. पुणे येथे उपचार घेत असणाऱ्या पॉझिटिव वृद्ध महिलेचा निधन झाले असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.
आजपर्यंत कोरोना पासून दूर राहिलेल्या शिरूरला एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव आल्याने आणि वृद्ध पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्याने शिरूर शहरात खळबळ उडवून दिली आहे. शिरूर नगरपालिकेने लॉक डाऊन सुरू झाल्यापासूनच्या दोन महिन्यापर्यंत मोठी खबरदारी घेतली होती परंतु मुंबईवरून आलेल्या साडू मुळे शिरूरकरांच्या तोंडचे पाणी पळाले अशी म्हणण्याची ची वेळ आली आहे. या रुग्णाचा मुलगाही संशयित वाटत असल्याने त्या दोघांना पुणे औंध रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.
या नागरिकाचे मुंबई येथे 19 मे रोजी कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले होते, त्यानंतर तो पास घेऊन शिरूर येथे प्रीतम प्रकाश नगर येथे आपल्या नातेवाईकाकडे आला होता अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली. त्यानंतर तो 27 मे रोजी रात्री शिरूर येथे चार जणांच्या कुटुंबासह दाखल झाला होता. या रुग्णाला कालच शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी होम क्वॉरटाईन केले होते.
मुंबई येथील हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मुंबई येथे आढळला होता परंतु या रुग्णाचा तपास लागत नव्हता. अखेर हा रुग्ण शिरूर येथे असल्याचे मुंबई येथील आरोग्य खात्याला समजल्यावर मुंबई आरोग्य खात्याने शिरूर येथील आरोग्य खात्याला याची माहिती दिली.या रुग्णाचा तपास करून याला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले असल्याचेही शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.
तर शिरूर येथील जोशीवाडी भागातील एक वृद्ध महिला शिरूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती मात्र याठिकाणी तिला त्रास जाणवत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालय येथून तिला पुणे ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुणे ससून रुग्णालयात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला असून या वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.