बारामती (प्रतिनिधी) : पत्नीशी अनैसर्गिक संबंध ठेवत तिचा शारीरिक छळ व फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस कर्मचारी अकबर कादीर शेख ( वय 27) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर शेख याचा विवाह दि 31 मार्च. 2018 रोजी तक्रारदार यांच्यासोबत आळंदी या ठिकाणी झालेला आहे. त्यांना एक मुलगा आहे.
लग्न झाल्यापासून शेख तक्रारदार महिलेस कधीही मूळगावी नेले नाही. तसेच छोट्या-मोठ्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. हे लग्न होण्यापूर्वी सुद्धा त्याचे पहिले लग्न झाल्याचा तक्रारदार यांना माहिती समजली.
याबाबत तक्रारदर त्याच्याशी बोलले असता तिला दमदाटी केली. तसेच तक्रारदार यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच तिच्या व मुलाच्या नावाची कोणतीही कागदपत्रे अद्याप काढलेली नाहीत. या प्रकारची तक्रार दाखल केल्याने सदर कर्मचाऱ्यावर 498अ 504 506 व सदर महिलेने पुरवणी जबाब दिल्याने भादवि कलम 377 प्रमाणे कलम वाढ करून गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.