मुंबई : आज पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा पहिला सामना आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक (टाॅस) जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@gujarat_titans have elected to bowl against @mipaltan.
Follow the match ▶️ https://t.co/2bqbwTHMRS #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/Euqi2ym9Ce
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघात कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये बदल केला. अष्टपैलू हृतिक शोकीनच्या जागी लेगस्पिनर मुरुगन अश्विनचे पुनरागमन झाले आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.
गुजरात टायटन्स प्लेइंग-11 : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, प्रदीप संगवान, लोकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.
मुंबईच्या संघात टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स आणि रिले मेडिथ हे चार परदेशी खेळाडू आहेत. त्याचबरोबर गुजरातच्या संघात डेव्हिड मिलर, राशिद खान, लोकी फर्ग्युसन आणि अल्झारी जोसेफ या चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, गुजरात संघाचे 10 सामन्यात 16 गुण असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. मुंबईचा संघ अजून एक सामना हरला तर अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. मुंबईचे 9 सामन्यात फक्त 2 गुण असून ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत.