चंदिगढ – आम आदमीचे राजकारण करण्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या आमदाराची आलिशान लाइफ चर्चेचा विषय बनली आहे. लुधियाना पश्चिम येथील आमदार गुरप्रीत गोगी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोगी पिवळ्या रंगाच्या पोर्श कारमध्ये बसताना दिसत आहेत.
गोगींची चर्चा होण्याचे कारण म्हणजे गेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी अनेक गरीब उमेदवार उभे केले आणि त्यांना त्यांच्या पक्षाचा पोस्टर बॉय देखील बनवले. केजरीवाल यांची ही युक्ती खूप उपयुक्त ठरली आणि पंजाब निवडणुकीच्या निकालात आपने 92 जागा जिंकल्या. निवडणुकीदरम्यान गोगी बजाजच्या जुन्या स्कूटरवरून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. मात्र आता त्यांची आलिशान लाईफ समोर आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात ते पिवळ्या पोर्श कारमधून सरकारी कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे.
नॉमिनेशन के लिए स्कूटर और चुनाव जीतने के बाद करोड़ों की कार ऐसे आम लोग सिर्फ आम आदमी पार्टी में ही मिलते हैं! pic.twitter.com/8dCGCGY1TM
— Krishna Allavaru (@Allavaru) May 5, 2022
पंजाबचे भाजप नेते आणि पक्षाचे सरचिटणीस तरुण चुग यांनी हा व्हिडिओ ट्विट करून लिहिले की, “वाह रे अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी… निवडणुकीपूर्वी स्कूटर आणि जिंकल्यानंतर करोडोंची कार, लुधियाना पश्चिमचे आमदार गुरप्रीत गोगी जी पोर्च कारमधून कार्यालयात पोहोचले… ही तीच व्यक्ती आहे जी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्कूटरवरून निघाली होती. हा फसवणूकीचा खेळ फार काळ चालणार नाही.”