चंदीगड – शाळा बंद असल्याने सध्या कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. हरियाणातील रोहतक येथील एका कोचिंग क्लासेसबाहेर विद्यार्थींनीमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भांडणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अनेक मिनीटं त्यांचं हे भांडण सुरु होत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
रोहतक भागात एका काॅलनीत कोचिंग सेंटर आहे. शुक्रावारी दुपारी सेंटरबाहरे अचानक विद्यार्थीनींच्या दोन गटांत बाचाबाची सुरु झाली. नंतर त्या एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. या हाणामारीत विद्यार्थीनींना दुखापत झाल्याची माहिती आहे. रस्त्यावरच भांडण सुरु असल्याने तेथून ये-जा काही लोक बघ्याची भूमिका घेत होते तर काहींना त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे भांडण सुरुच होते. अखेर वाद जास्तच वाढत असल्याने नागरिकांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. मुलींमधील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘या प्रकरणाबाबत अद्याप कोणीही तक्रार देण्यासाठी आले नाही. कोणी याबाबत तक्रार करण्यास आल्यास पुढील कारवाई केली जाईल.’ असे आर्य नगर ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणी बोलताना सांगितले.