दोहा – कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वकरंडक ( FIFA WorldCup ) फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या करंडकाचे अनावरण यंदा चक्क भारताची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोन करणार आहे. हा मान मिळवणारी दीपिका भारताची पहिलीच अभिनेत्री ठरणार आहे. दीपिका पुढील आठवड्यात कतारला रवाना होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे संपूर्ण फुटबॉल जगत साक्षीदार होणार आहे. कतारमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा पहिल्यांदाच एका आखाती देशात होत आहे.
“संघ निवड म्हणजे लग्नाच्या वरातीप्रमाणे सावळा गोंधळच”, अजय जडेजाची टीका
या ( FIFA WorldCup ) स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 18 डिसेंबरला होणार आहे. यासाठी दीपिकाला हा मान देत आमंत्रित करण्यात आले होते व तिनेही लगेचच होकार कळवला होता. दीपिकाचा पती व प्रसिद्ध अभिनेता रणबीर सिंग याने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यात आपली उपस्थिती लावत तेथे झालेल्या कार्यक्रमातही रंग भरले होते. त्या प्रत्येक वेळी दीपिकाही उपस्थित राहात होती. आता तिलाच जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) यंदाच्या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या करंडकाच्या अनावरणाचा मान दिला आहे.
“संघ निवड म्हणजे लग्नाच्या वरातीप्रमाणे सावळा गोंधळच”, अजय जडेजाची टीका
दीपिकाला यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ज्युरी मेंबर म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यामुळे आता फुटबॉल विश्वकरंडकाच्या अनावरण सोहळ्यासह तिने संपूर्ण देशाची शान वाढवली आहे. नुकतेच गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दीपिकाचा जगातील 10 सर्वांत सुंदर महिलांच्या यादीतही समावेश केला आहे.