फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्याच्या विनंती याचिकेस न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ताची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करावी यासाठी त्याने ही विनंती याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
2012 Delhi gangrape case: One of the convict Pawan’s curative petition has been dismissed by the Supreme Court. The petition had sought commutation of his death penalty to life imprisonment. pic.twitter.com/2KhruqyxVb
— ANI (@ANI) March 2, 2020
पवनने आपल्या याचिकेत म्हटले होते की, घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन होता. याप्रकरणी त्याची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने पवनची याचिका फेटाळली आहे.
दरम्यान, पवनकडे अद्याप राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच दुसरीकडे अन्य दोषी अक्षय सिंह याने देखील शनिवारी राष्ट्रपतींसमोर पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली.
कनिष्ठ कोर्टाने 17 फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करती 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशीची तारिख निश्चित केली होती.