नवी दिल्ली – विमानात प्रवास करताना आता फ्लाईट मोडवर जाण्याची गरज राहणार नाही. लवकरच विमानांमध्ये इंटरनेट वापराची सुविधा सुरु होणार आहे. त्यामुळे लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब फक्त बॅगेत किंवा खिशात न ठेवता त्यांचा वापर करणं शक्य होणार आहे. मोदी सरकारने विमान उड्डाणावेळी वाय-फायची सुविधा देण्यास परवानगी दिली आहे.
विमानातून प्रवास करताना प्रवाशांना आपले मोबाईल बंद अथवा फ्लाईट मोडवर ठेवावे लागतात. मात्र, नागरी उड्डाण मंत्रालयाने यावरील बंधने हटवली आहे. विमानात पायलट प्रवाशांना इंटरनेट वापरण्याची परवानगी देऊ शकतो. यामुळे लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच, ई-रीडरमध्ये वाय-फाय वापरणे शक्य होणार आहे. मात्र, हे वापरताना डिव्हाइस फ्लाईट मोडवर ठेवावा लागणार आहे.
Ministry of Civil Aviation: The Director-General shall certify the aircraft for the usage of internet service in-flight through Wi-Fi onboard. https://t.co/ewzwekH8DB
— ANI (@ANI) March 2, 2020
दरम्यान, विमान उड्डाणावेळी वाय-फायची सुविधा देण्याची घोषणा याआधी टाटा समूहची कंपनी नेल्को आणि पॅनासॉनिक एवियॉनिक्स कॉरपोरेशनने मागील महिन्यात केली होती.