Corona – देशात पुन्हा कोविड (Corona) डोके वर काढू लागल्याची चिन्हे दिसत असताना कर्नाटक सरकारने (Karnataka government) त्या संबंधात दक्षता आदेश जारी केला आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी, आजार असलेल्या लोकांनी, गरोदर स्त्रिया आणि
स्तनदा मातांनी घराबाहेर पडताना फेस मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे. लोकांनी हवेशीर नसलेल्या जागा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे काटेकोरपणे टाळण्यास सांगितले आहे. कर्नाटक शेजारील केरळ राज्यात कोविडचा नवीन विषाणू आढळून आल्याने ही दक्षता घेतली जात आहे.
तसेच कर्नाटक सरकारने केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि कोविड प्रकरणांची पुरेशी चाचणी आणि वेळेवर अहवाल देण्याचे निर्देश देणारे परिपत्रक जारी केले आहे.
ताप, खोकला, सर्दी आणि वाहणारे नाक यासारखी श्वसनाची लक्षणे असलेल्या सर्वांनी लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे त्यात म्हटले आहे,अशा लोकांनी फेस मास्क घालावा अशी सुचना त्यांना करण्यात आली आहे.
वारंवार हात धुण्यासह चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक आहे, असे परिपत्रकात पुढे म्हटले आहे.अस्वस्थ असताना घरीच रहा आणि इतर लोकांशी, विशेषत: ज्येष्ठ आणि असुरक्षित लोकांशी संपर्क कमी करा. अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.