धास्तीने थंडी तापाचे रुग्ण जाईनात दवाखान्यात

नेवासा फाटा  -राज्यात करोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ग्रामीण भागातील खेडेगावातील लोकांना सर्दी, खोकला झाला, तरी करोनाच्या धास्तीने कोणी
दवाखान्यात जाईनात.

दवाखान्यात गेले, तर तोंड बांधलेले डॉक्‍टर रुग्णाला गाडीत टाकून थेट नगरला हालवित असल्याने करोनाची झंजट मिटेपर्यंत नकोच तो दवाखाना, अशीच मानसिकता ग्रामीण भागात निर्माण झाल्याने दवाखान्यांत सगळीकडे सामसूम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

करोनाच्या आजारामुळे आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दुखणे अंगावर काढत आहेत. दवाखान्यात गेले, तर सर्दी, खोकला म्हटले की लगेचच तपासणीसाठी रुग्णाला हालविले जातात. परत ‘त्या’ व्यक्तीचा संपर्कही होत नाही. त्यामुळे नकोच ‘तो’ दवाखाना अशी मानसिकता ग्रामीण भागात पसरली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांसह ग्रामीण रुग्णालयात भयाण शांतता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.