काबुलच्या गुरुद्वारावर दहशतवाद्यांचा हल्ला ; २५ जण ठार

काबुल : जगावर एकीकडे कोरोना व्हायरसचे संकट ओढवले असताना दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी शीख गुरुद्वारामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ला केला आहे. या हल्ल्यात २५ जण ठार झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे.

सशस्त्र आत्मघाती हल्लेखोरांनी काबूलच्या पीडी१ भागातील गुरुद्वारावर ७.४७ वाजता हल्ला केला. त्यात २५ जण ठार झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्यात सहा तास चकमक झाली. त्यात चार हल्लेखोर ठार झाले, अशी माहिती अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दिली. या गुरुद्वारातून महिला आणि मुलांसह ८० जणांना वाचविण्यात यश आले आहे.

या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली. याआधीही इसिसने शिखांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले होते. अफगाणिस्तानात दोन वर्षांपूर्वी इसिसने  शिखांच्या मेळाव्यावर केलेल्या हल्ल्यात १९ जण ठार झाले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघारी घेण्याची ग्वाही देत तालिबानशी शांतता करार केला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे शांतता धोक्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.