FASTag : फास्टॅग वाहनचालकांसाठी आवश्यक झाले आहे. फास्टॅगमुळे पैसा आणि वेळेची बचत होते. फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये नवीन महिन्यापासून काही बदल होणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) ने फास्टॅगबाबत कठोर कारवाई केली आहे. NHAI ने सर्व Fastag ग्राहकांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. NHAI ने म्हटले आहे की, सर्व फास्टॅग वापरकर्त्यांनी त्यांच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करावे, केवायसी न केल्यास, फास्टॅग निष्क्रिय केले करणार आहे.
केवायसी न केलेले फास्टॅग निष्क्रिय करण्याची प्रक्रिया 31 जानेवारीनंतर सुरू होणार आहे. केवायसीसाठी फक्त दोन आठवडे उरले आहेत. त्यामुळे तुम्ही वेळ न घालवता तुमचे फास्टॅग केवायसी करून घ्या.
तसेच पुढील महिन्यापासून ज्या यूजर्सनी अनेक फास्टॅग घेतले आहेत, त्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. NHAI ने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश एकाच कारला अनेक फास्टॅग जोडण्याच्या किंवा अनेक कारसाठी एकच फास्टॅग वापरण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे आहे.
फास्टॅगची केवायसी कशी करायची ?
– प्रथम https://fastag.ihmcl.com/ या संकेतस्थळावर जा.
– तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा.
– डॅशबोर्ड मेनूमध्ये माझे प्रोफाइल पर्याय उघडा.
– माझे प्रोफाइल पर्यायामध्ये केवायसी स्थिती तपासा.
– केवायसी पूर्ण नसल्यास, केवायसी सबसेक्शनमध्ये जा.
– आवश्यक माहिती भरा
– आयडी पुरावा, पत्ता पुरावा आणि फोटो सबमिट करा.
– यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल.