शेवगाव (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात सुराज्य रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने गोर गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना उज्वला युरिया खताचे मोफत वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे, असे प्रतिपादन सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर शिरसाठ यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील वडुले, वाघोली, ढोरजळगाव, निंबेनांदूर, गरडवाडी, मळेगाव, सामनगाव, आव्हाणे, चव्हाणवाडी, अमरापूर, दिंडेवाडी, या 11 गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 2 गोण्या युरिया खताचे वाटप करण्यात आले.
शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले, ढोरजळगावचे सरपंच डॉ.सुधाकर लांडे, ए. डी. सी.सी.बॅंकेचे तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, राजेंद्र देशमुख, रोहन साबळे, दिगंबर देशमुख, शहादेव खोसे, संदीप बडे, संकेत वांढेकर, कृष्णा सातपुते उपस्थित होते. खा.सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
केंद्राकडून राज्याला होणारा युरिया खताचा पुरवठा कमी प्रमाणात असल्यामुळे राज्यात मागणी तेव्हढा युरिया खताचा पुरवठा होत नाही. त्यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणात युरिया खताचा पुरवठा व्हावा अशी मागणी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असल्याचे घुले
यांनी सांगितले.