“मूठभर दलाल-आडती आज जिंकले” – सदाभाऊ खोत

मुंबई – शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे. आज शेतकऱ्याला मिळालेले स्वातंत्र्य हे संपुष्टात आले, शेतकरी पारतंत्र्यात गेला. शेतकऱ्यांना जे या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले. मूठभर दलाल आडती हे आज जिंकले, पण दलालच्या तावडीतून सुटू इच्छिणारा शेतकरी मात्र हारला, त्याचा पराभव झाला आहे, असे शेतकरी नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते. यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे, त्यांना आता संधी मिळाली आहे. कृषी कायदे मागे घेतल्याने आता लुटणाऱ्यांना पुहन सुगीचे दिवस आले, असे म्हणता येईल. शेतकऱ्यांना मात्र गळफास आला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.