Entertainment – सध्या देशभरात विशेष म्हणजे महाराष्ट्रात गणपती पूजनाचा सण साजरा केला जातोय. अशात सर्वसामान्य लोकांपासून ते बॉलीवूड सेलेब्स पर्यंत गणेश चतुर्थी सण जल्लोषात साजरा करतांना दिसत आहे. अशात सोशल मीडियावरही अनेक सेलेब्स गणपती उत्सव साजरा करत फोटो शेअर करत आहे.
अनुष्का शर्मा, राजकुमार राव, सारा अली खान, सोनू सूद, तुषार कपूर, सलमान खान, शिल्पा शेट्टी सह अनेक सेलेब्सने बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. अशातच फरहान खानने सुद्धा सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
मात्र सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे फरहान चांगलीच ट्रोल केले आहे. या ट्रोलिंगवर आता फरहानने प्रतिउत्तर दिले आहे. नेमकं झालं असं की, इंस्टाग्राम अकाउंट वर राजकुमार राव-पत्रलेखा यांच्या सोबतचा एक फोटो फरहानने शेअर केला.
या फोटोत फराह ब्लू एंड व्हाइट प्रिंटेड सूट परिधान केला होता त्याच सोबत मैचिंग स्लीपर्स घातलेली होती. या फोटोला शेअर करत फराह खानने लिहिले, ‘खान, कुरैशी आणि राव यांच्या कडून हैप्पी गणेश चतुर्थी…!’ राजकुमार राव तू इतका बिजी होता की आम्ही तुझ्याशिवाय सेलेब्रेशन केले.
फरहान ला या फोटो चप्पल घातलेली पाहून नेटीजन्स तिला ट्रोल करत आहे. एक युजर्सने लिहिले आहे. कृपया स्लीपर काढून पूजा करा चप्पल बाप्पा पुढे घालू नका. पूजा करतांना चप्पल कोण घालत. असे अनेक कंमेंट्स आता फरहाच्या या फोटोवर युजर्स करत आहे, या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
दरम्यान सोशल मीडिया वर वाढती ट्रोलिंग पाहून फराह खानने कमेंट करत लिहिले, ‘आम्ही घराबाहेर आहोत. सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण तुझी नजर चप्पलवर पडली. हे तुमचे खूप विषारी मन आहे.’ कोरिओग्राफरच्या या कमेंटवर एका यूजरने लिहिले की ‘मला वाटते की तुम्हाला उत्तर देण्याची गरज नाही, हे लोक IQ शिवाय खूप ओव्हरस्मार्ट आहेत.’ असं म्हणत फरहाच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे.