मुंबई – ‘द कपिल शर्मा शो’मधून घरा घरात पोहचलेला सुनील ग्रोवर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. कॉमेडी शो आणि गब्बर सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा सुनील सोशल मीडियावर देखील हटके पोस्ट टाकत असतो. अभिनयाप्रमाणे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून देखील सुनील जणू प्रेक्षकांचेच मनोरंजन करतो असच वाटत असत. सध्या सुनीलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तो चांगलाच कॅचर्चेत आला आहे.
सुनीलने आपल्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो जॅकेट आणि जीन्स घालून चक्क एका साध्य दुचाकीवर बसलेलो दिसतोय. या दुचाकीवर मागच्या बाजूला दुधाची किटली अडकवलेली दिसते. सुनीलचा हा फणी अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. त्याहूनही जास्त आवडलं आहे ते म्हणजे ‘दूध मचाले’ हे त्याने दिलेलं कॅप्शन.
View this post on Instagram
या फोटोवरून सुनीलला चाहत्यांनी असंख्य प्रश्न विचहरले आहेत. एका चाहत्याने ‘तू नवीन व्यवसाय सुरु केला का ?’ असा सवाल विचारला आहे. तर दुसऱ्याने ‘दूध विकून झालं असेल तर बाईक देता का?’ अशी कमेंट केली आहे. चाहत्यांच्या कमेंटबाजीमुळे सुनीलचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
देवभूमीतील फ्रेश लव्हस्टोरी ! अमेय वाघ आणि वैदेहीची भन्नाट केमेस्ट्री JAGGU ANI JULIET’ चा हटके Teaser प्रदर्शित