मुंबई – सध्या देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्याचा प्रभाव बॉलिवूडवर झालेला दिसून येतोय. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यात आता बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि म्यूजिक कंपोजर ‘बप्पी लहरी’ यांना सुद्धा करोनाची लागण झाली आहे.
Veteran music composer Bappi Lahiri has been admitted to Mumbai’s Breach Candy Hospital after testing positive for #COVID19, confirms the singer’s spokesperson
(Picture source: Bappi Lahiri’s Instagram account) pic.twitter.com/FMwe1PVsfq
— ANI (@ANI) March 31, 2021
बप्पी लहरी यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 नोव्हेंबर 1952 मध्ये पश्चिम बंगालमध्ये बप्पी लहरी यांचा जन्म झाला. 1973 मध्ये त्यांनी ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली. 1976 मध्ये आलेल्या विशाल-आनंद यांच्या ‘चलते-चलते’ चित्रपटातून बप्पी दा यांना ओळख मिळाली. बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला पार केला आहे.
बप्पी लहरी यांनी 500 पेक्षा जास्त गाणी कंपोज केलीत आणि स्वत:साठी एक लीजंड किताब मिळवला आहे. पॉप म्युझिकला बॉलिवूडचा एक महत्वाचा भाग बनवण्याचं श्रेय बप्पी लहरी यांना जातं. विषय 80 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांचा असो वा अलिकडे त्यांनी गायलेल्या गाण्याचा असो. यामध्ये बप्पी लहरी यांचा मोठा वाटा आहे.