पणजी : चीन मधील एक समाज आजही निसर्गाचा आदर राखतो. निसर्गात राहून निसर्गाचा सन्मान करतो. याबाबत सुंदर अशा छायाचित्रणाद्वारे सांगण्याचा प्रयत्न चीन ची दिग्दर्शिका वेन ली हीने तिच्या ‘फीलिंग टू टेल’ या चित्रपटाद्वारे केला आहे.
शहरातील एक तरुण चित्रकार चीन मधील एका अशा निसर्ग रम्य भागात जातो जिथं अजून पर्यंत जास्त कुणी गेलेलं नाहीये. तो चित्रकार तिथे एका व्यक्तीला भेटतो. ही व्यक्ती एका अशा समाजातून आहे जो समाज आजही विविध प्रथांमधून निसर्गाचा आदर ठेवतो आहे. तो चित्रकार तरुण राहतो. विविध ऋतुंमध्ये तो चित्रकार त्या व्यक्ती राहतो.
दरम्यान, त्या व्यक्तीच्या मुली सोबत या तरुणाची ओळख होते. ती मुलगी त्यांच्या समाजातील विविध प्रथा सादर करत असते. तो चित्रकार तरुण त्या मुलीला शहरात येण्या विषयी विचारतो. पण समाजापुढे त्या मुलीचं काहीच चालत नाही. एकूणच खूप साधी अशी कथा या चित्रपटाची आहे. चित्रपटाचा मुख्य गाभा आहे तो म्हणजे सुरेख असं छायाचित्रण. चीन मधील सुंदर अशा नद्या, डोंगर असलेल्या भाग या चित्रपटात दाखवला आहे.
हा सुंदर निसर्ग हे या चित्रपटाचे एक पात्रच आहे असं म्हंटल्यास हरकत नाही. एक छानशी व्हिज्युअल ट्रीट पाहायला मिळाली, असं आपण हा सिनेमा पाहिल्यानंतर नक्कीच म्हणू शकतो. शिवाय त्यालाच साजेसं असं पार्श्वसंगीत चित्रपटात वापरलं गेलं आहे. इफ्फी २०१९ मध्ये सोल ऑफ एशिया या विभागात चीन मधील ‘फीलिंग टू टेल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शिका वेन ली ही स्वतः यावेळी उपस्थित होती. हा चित्रपट तिने तिच्या आजीला समर्पित केला असल्याचं यावेळी सांगितलं.