मुंबई – मुंबईतील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांची बारामतीत कोट्यवधींची संपत्ती असून मुंबईतील एक नेता बक्षिसपत्र म्हणून बागवान जमीन देत असल्याचा आरोप करत त्यांच्या भावाशी केलेल्या संवादाचा पेनड्राईव्ह गृहमंत्र्यांना सादर केला.
फडणवीस यांनी आरोपांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला आणि मुंबई पोलीस दलातील निवृत्त अधिकारी इसाक बागवान यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे फडणवीस यांनी उल्लेख केलेला दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेला तो नेता कोण याबाबतही उलट सुलट चर्चा सुरू झाली. निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या बारामतीतील संपत्तीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरोप केले ती संपत्ती नेमकी आहे तरी कोणती अशी उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
फडणवीस यांच्या आरोपानुसार बागवान यांची बारामतीत संपत्ती
बारामती – इंदापूर रोडवर मधून रिंगरोड गेलेली 42 एकर शेती, एनए प्लॉट सध्याचे बाजारमूल्य 40ते 50लाख रुपये गुंठा, बारामती शहरातील फलटण चौक येथे असलेले 30रूमचे लॉजिंग बोर्डिंग ग्रेड हॉटेल नीलम पॅलेस, रिंग रोडवरील जमिनीत चालू असलेला 225 फ्लॅटची स्कीम, बारामती भिगवण रोडवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग बंगल्यापासून फक्त 1 मिनिट अंतरावर असलेला 94 गुंठे म्हणजे अडीच एकराचा एनए प्लॉट.