Nirmala Sitharaman – जगभरातील सर्व वित्तीय केंद्रे भांडवलाच्या सुरक्षेला प्राधान्य देतात अशी एक मनोरंजक टिप्पणी काल पंतप्रधानांना करण्यात आली. भारत या दिशेने सकारात्मक पावले उचलत आहे. गुंतवणुक करण्यायोग्य पैशाचा प्रवाह सुलभ करणे आणि पैसे बाहेर जाण्याची सुलभता यावर चर्चा केली जात आहे.
गिफ्ट सिटीची संकल्पना मांडतानाही पंतप्रधानांचे मत होते की, तंत्रज्ञान आणि वित्त यांचा समावेश केल्याशिवाय नव्याने निर्माण झालेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र खऱ्या अर्थाने पूर्ण उर्जेने आपले सर्वोत्तम देऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ ला दुसऱ्या दिवशी सीतारामन आणि रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चर्चासत्राला संबोधित केले.
सीतारामन यांनी सांगितले की, सध्या आयएफएससीमध्ये, आमच्याकडे आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजसह तीन एक्सचेंज आहेत. आयएफएससीमध्यसध्या २५ प्रमुख बँका कार्यरत आहेत, त्यापैकी ९ विदेशी बँका आहेत. आयएफएससीने २६ विमान कंपन्यांनाही आकर्षित केले आहे. या कंपन्यांनी एकत्रितपणे 136 मालमत्ता भाडेतत्वावर घेतल्या आहेत. त्याचा लाभ देशांतर्गत हवाई वाहतुकीला होणार आहे.
80 निधी व्यवस्थापकांनी आठ विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसह 89 योजना आणि 29 विमा संस्था स्थापन केल्या आहेत. आठ जहाज भाड्याने भारत सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही भारतातील जहाजबांधणी उपक्रमांना बळकटी देऊ, असे सांगून अर्थमंत्री म्हणाल्या की गिफ्ट सिटीमधील सकारात्मक वातावरणामुळे, आम्ही जागतिक वित्तपुरवठा सुलभपणे करू शकू आणि आमचे शिपिंग यार्ड तयार करू. त्यामुळे आमच्या सागरी वाहतूक क्षेत्रातील क्षमतांचा वापर सर्व जण पूर्ण क्षमतेने करु शकतील.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगरमध्ये सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर आयोजित चर्चासत्रात भाग घेतला. यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत जूनमध्ये मायक्रोनसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि ९० दिवसांच्या आत कारखान्याचे बांधकाम सप्टेंबरमध्ये सुरू झाले. सेमीकंडक्टर क्षेत्रातील हे मोठे योगदान आहे. आता आपण अभिमानाने सांगू शकतो की आपल्याकडे अशी सरकारे आहेत, जी आपल्या पंतप्रधानांच्या व्हिजनची अंमलबजावणी करू शकतील.
सर्वात मोठा ग्रीन पॉवर क्लस्टर गुजरातमध्ये
जगातील सर्वात मोठा ग्रीन पॉवर क्लस्टर गुजरातमध्ये बांधला जाणार आहे. त्याबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, आपल्या ग्रहाला ज्या प्रकारे संरक्षित करायचे आहे ते आपल्या धोरण ठरवण्याच्या शीर्षस्थानी आहे. जगातील प्रत्येकजण उत्पादन प्रक्रियेत हरित ऊर्जेची मागणी करत आहे.
गुजरातमध्ये ३० हजार मेगावॅटचे हरित ऊर्जा हब आहे. जगातील सर्वात मोठा ग्रीन पॉवर क्लस्टर ५००० ते ७००० मेगावॅट आहे. त्यामुळे आता गुजरातचा ग्रीन पॉवर क्लस्टर संपूर्ण जगात सर्वात मोठा होईल. ग्रीन पॉवर असलेल्या उत्पादनांची निर्मिती करण्याची ही एक उत्तम संधी आहे.