India vs Afghanistan 1st T20 Match Live Cricket Score : आज मोहाली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे.
त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे पहिला सामना खेळत नाहीये. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजीचा निर्णय घेत अफगाणिस्तान संघास प्रथम फलंदाजीसाठी बोलवलं आहे. संजू सॅमसन हा सामना खेळत नाही. यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माला प्राधान्य देण्यात आले आहे. जितेशचे हे घरचे मैदान आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.
#INDvAFG 1st T20 : भारतानं Toss जिंकला, कर्णधार रोहितनं घेतला ‘हा’ निर्णय…
IND vs AFG : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.
#TeamIndia Captain @ImRo45 wins the toss and elects to bowl first in the 1st T20I.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/hhj7wGbXqt #INDvAFG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AUlCcYwCXP
— BCCI (@BCCI) January 11, 2024
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली गुरुवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नसला तरी 35 वर्षीय विराट कोहली IND vs AFG T20 मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला मोहालीत, तर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. 17 जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.