मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याकारणाने ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
Extortion case | Look Out Circular issued against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file photo): Thane Police Commissioner Jai Jeet Singh to ANI pic.twitter.com/BUT4GimcXA
— ANI (@ANI) August 13, 2021
परमबीर सिंह यांच्याविरोधात कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना आज लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंग यांनी दिली आहे.
अटकेत असलेल्या आरोपींविरोधातील मोक्का अंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी त्यांनी आरोपींकडून खंडणी घेतल्याच्या तक्रारी कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यावेळी परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलिस आयुक्त पदावर रुजू होते.