पुणे : जून्या पैशाच्या वादातुन धायरी येथील तरुणाचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण करुन सांगली तासगाव येथे एका शेड मध्ये कोंडुन मारहान करुन फ़ोन द्वारे खंडणी मागीतली. या प्रकरणी अमोल उत्तम मोरे (रा.बिरनवाडी , सांगली ) याला पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे साहेब यांनी जामीन मंजुर केला आहे.
दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची एफआयआर पीड़िताच्या पत्नी द्वारे नोंदविण्यात आलेली होती. सदर प्रकरणात एकूण ६ आरोपींविरुद्ध अपहरण , खंडणी व मारहाण केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात आरोपीने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड.ओंकार फडतरे ॲड. अजिंक्य पोळ यांच्या मार्फ़त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाख़ल केला होता.
आरोपीचे नाव एफआयआर मध्ये नाही , आरोपी सदर ठिकानी उपस्थित असल्याचा कोणताही पुरावा नाही तसेच आरोपीने कोणतीही पैशाची मागनी केली नाही, असा युक्तिवाद आरोपी तर्फ़े ॲड. अभिषेक हरगणे यांनी केला.
उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाड्याचे दाखले देत ॲड .हरगणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन न्यायालयाने मंजूर केला.