म्युनिक, (जर्मनी) – म्युनिक संरश्क्षण परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर ( External Affairs Minister of India S Jaishankar ) यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. त्यामध्ये सौदी अरेबिया, नॉर्वे, पोर्तुगाल, पोलंड आणि बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश होता. यावेळी द्विपक्षीय मुद्यांसह दक्षिण आशियातील परिस्थिती आणि बहुस्तरिय रचनेतील सुधारणांबद्दलही चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.
रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाच्या मुद्यावर जयशंकर यांनी पोलंडचे परराष्ट्र मंत्र्यांशीही चर्चा केली. जर्मनीतील ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाचे नेते फ्रेडरिक मर्झ यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी जर्मनी आणि युरोपीय संघाला भारताचा असलेल्या पाठिंब्याचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला.
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ, सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर: मार्ग्रेट वेस्टेजर, डिजिटल युगासाठी योग्य असलेल्या युरोपियन कमिशनचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि स्पर्धा आयुक्त आणि मेघन ओ’सुलिव्हन, इराक आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशीही जयशंकर यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.