नवी दिल्ली – किमान वेतन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने एका तज्ञ समितीची नियुक्ती केली आहे. प्राध्यापक अजित मिश्रा हे या तज्ञ समितीच्या प्रमुख पदावर असणार आहेत.
ही समिती किमान वेतन आणि राष्ट्रीय पातळीवरील किमान वेतन ठरविण्यासाठी शिफारसी करणार आहे.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. विविध क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतन वेगवेगळे असते. मात्र राष्ट्रीय स्तरावरील किमान वेतन ठरविल्यानंतर कोणत्याही क्षेत्रातील कामगाराला या किमान वेतनापेक्षा कमी वेतन देता येत नाही.
ही समिती जागतिक पातळीवरील किमान वेतनाचा अभ्यास करेल आणि त्या आधारावर शिफारशी सादर करेल.