‘या’ राज्यात लॉकडाऊन वाढवला; महाराष्ट्रापेक्षा जास्त नवीन करोनाबाधित

बंगळूर –कर्नाटकमधील लॉकडाऊनला आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ते राज्य 14 जूनपर्यंत म्हणजेच जवळपास महिनाभर लॉक राहील. कर्नाटकमधील नव्या करोनाबाधितांची दैनंदिन संख्या घटत आहे. तसे असले तरी करोना फैलाव कायम आहे. त्यामुळे तज्ञांच्या शिफारसीवरून लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी गुरूवारी जाहीर केले.

करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी कर्नाटकात 27 एप्रिलपासून विविध निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर 10 ते 24 मे या कालावधीसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याची मुदत 7 जूनपर्यंत वाढवण्यात आली. आता आणखी आठवडाभरासाठी तो कायम असेल.

कर्नाटकमध्ये गुरूवारी 18 हजारहून अधिक नवे बाधित आढळले. ती संख्या आधीच्या दिवसापेक्षा 2 हजारने अधिक आहे. ती विचारात घेऊन लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्या राज्यात आतापर्यंत 26 लाख 53 हजार बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील 30 हजारहून अधिक बाधित दगावले आहेत. मागील काही दिवसांपासून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कर्नाटकला दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.