खडकवासला – शिंदे गटाचे प्रतोद यांची निवड बेकायदेशीर आहे, राज्यपालांनी विश्वास दर्शक ठरावाची केलेली सूचनाही बेकायदेशीर आहे तर मग हे सरकार तरी कायदेशीर कसे ते बेकायदेशीरच आहे, न्यायालयाच्या निर्णयाची प्रत घेऊन लोकांमध्ये जा आणि लोकांना निकाल समजून सांगा, असे आवाहन आमदार सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना केले.
नऱ्ह येथे खडकवासला मतदार संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार अहिर यांनी सरकारवर सडेतोड टिका केली. न्यायालयाच्या निर्णयाचे सविस्तर विश्लेषण केले. तसेच, सरकारकडे निधी नसतानाही नुसत्याच घोषणा करीत आहे. कामे काही होताना दिसत नाहीत. नवीन कार्यकारिणी नियुक्तीमुळे खडकवासलामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी वैभव वाघ यांनी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये समजून सांगितली. खडकवासला मतदार संघातील फारुख शेख, तसऊर खान, राजेंद्र मुदकन्ना, शशिकांत नारायणकर, परशुराम रायकर, तानाजी पवार, महिला आघाडीच्या पलक सुर्वे, सुनीता सुर्वे, छाया खंडाळकर, लता गुंजाळ, सुनीता मरगळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या बैठकीस खडकवासला संपर्कप्रमुख राजेश खाडे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, वैभव वाघ, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, रवी मुजुमले, नितीन वाघ, महेश मते, बुवा खाटपे, तानाजी पवळे, अनिल भोसले, योगेश पवार, सचिन पासलकर, मनीष जगदाळे, गोकुळ करंजावणे, संतोष शेलार, आकाश बालवडकर, अमित चोरघे उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पासलकर यांनी तर मनीष जगदाळे यांनी आभार मानले.