पिंपरी, (प्रतिनिधी) – श्री सकल संघ हित चिंतक पू. आचार्य हर्ष सागर सूरीजी यांचे शिष्य पू. हिरसागरजी एवं पू. नमिवर्षाश्रिजी म सा आदी ठाणा यांचे पावन सान्निध्यात वाकड परिसरातील जैन कुटुंबीयांचा श्री वासुपूज्य जैन संघ ह्या नावाने श्री संघ स्थापन करण्यात आला. या संघात वाकड, हिंजवडी, जगताप डेअरी, पिंपळे निलख, थेरगाव, ताथवडे, माण, मारूंजे, जांबे, नेरे, या परिसरात राहणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या जैन बांधवांचा समावेश करण्यात आलेला आहे.
येथील जैन बांधवांसाठी जैन मंदिराची स्थापना करून त्यांना सहजतेने पूज्य तीर्थंकरांच्या दर्शन, भक्ती व पूजेचा लाभ घेता यावा तसेच पू. गुरू भगवंतांच्या आवागमनामुळे त्यांच्या नवीन पिढीमध्येसुद्धा जैन धर्म, ज्ञान व संस्कारांची जडण घडण व्हावी या मुख्य हेतूने व जैन एकता आदी इतर काही सामाजिक, शैक्षणिक, मेडिकल व देशभक्तीपर उद्देशाने सदरील श्री वासुपूज्य जैन संघ, वाकड परिसर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
तत्कालीन स्वरूप जैन मंदिर निर्माण स्कीम मध्ये विविध लाभ घेण्याबाबत अधिक माहितीसाठी श्री संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश ओसवाल ९३७१००६८१७, सचिव रिखब जैन ९८२६०९८२८०, कोषाध्यक्ष कौशल जैन ८७९३३१५९२५, विश्वस्त हेमल जैन ९८३३५९९९५० व विश्वस्त देवेंद्र लोडाया ९४२३०१९१४१ यांनी त्यांना त्वरीत संपर्क साधण्याचे विनम्र आवाहन केले आहे. आता नियोजित ठिकाणी लवकरच जिन बिंब स्थापना होणार आहे.