नवी दिल्ली – बीसीसीआयलाही (BCCI) राज्य कामगार विमा कायद्यातील (ईएसआय) तरतुदी लागू असतील, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
ईएसआय (ESI) कायद्यातील तरतुदी बीसीसीआयलाही लागू होण्याबाबत 18 सप्टेंबर 1978 सालच्या निकषांनुसार बीसीसीआयला दुकान म्हणून संबोधित करावे का, याबाबतच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे.
न्यायमूर्ती एम. आर. शाह व पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने बीसीसीआयलाही ईएसआय कायद्यातील तरतुदी लागू होतील. तसेच बीसीसीआयला दुकान म्हणून ग्राह्य धरावे, या निर्णयालाही दुजोरा दिला आहे.
ईएसआय कायदा हा केंद्र सरकारने लागू केलेला असून तो हितकर आहे. या कायद्यातील तरतुदींचा शब्दशः अर्थ न घेता त्याकडे व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे, असे मतही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.