तळेगाव स्टेशन – योग्य प्रशिक्षण घेतले, तर व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होते आणि जीवनमान उंचावते, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगर पालिका शहरी जीवन्नोत्री अभियाच्या शहर अभियान व्यवस्थापिका ज्योती भोसले यांनी केले.
तळेगाव स्टेशन येथील रुडसेट संस्था आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमास रूडसेट संस्थाचे संचालक जयंत घोंगडे, प्रशिक्षक संदीप पाटील व हरीश बवचे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरी जीवन्नोत्री अभियानचे समूह संघटक उपस्थित होते. भारत सरकारच्या शहरी विभागच्या वतीने जीवन्नोत्री अभियानमार्फत “जीवनस्तर उंचावणे’ अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिका वतीने प्रशिक्षणार्थींना पाठवण्यात आले आहे.
या वेळी रूडसेट संस्थेचे संचालक जयंत घोंगडे यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप पाटील यांनी केले. हरीश बावचे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगीता गरुड, दिनेश निळकंठ व रवी घोजगे यांनी विशेष सहकार्य केले.