Uddhav Thackeray Train Travel । लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार ज्याप्रमाणे मैदानात उतरले आहेत. त्याचप्रमाणे त्या-त्या पक्षाचे प्रमुख देखील आपल्या शिलेदारांच्या प्रचारासाठी आपल्या ताकदीचा कस लावत आहेत. अशाच प्रकारे बोईसरमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेनंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर या सगळ्यांनी बोईसर ते वांद्रे असा लोकलने प्रवास केलाय. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर Uddhav Thackeray Train Travel ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता.मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या सभेतून सडेतोड उत्तर दिले. उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी,”तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात मोदींच नाणं चालणार नाही, इथे फक्त ठाकरे आणि पवारांचं नाणं चालणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी लोकल ट्रेनने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
#WATCH | Former Maharashtra CM and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray travels on a local train during his Palghar visit.
(Source: Shiv Sena (UBT) office) pic.twitter.com/4JfEni7zV8
— ANI (@ANI) April 12, 2024
भाजप हा भेकडांचा पक्ष Uddhav Thackeray Train Travel ।
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अमित शाह आले तेदेखील म्हणाले शिवसेना नकली आहे. आता मी भारतीय जनता पक्षाला म्हणतो की हा पक्ष भेकड आहे. मी भाजपाला भेकड यासाठी म्हणतो, कारण ईडी सीबीआय लावून दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात. अमित शाहांना विचारतो, तुमच्या भाजपात खऱ्या भाजपाचे किती नेते राहिले बघा. उद्धव ठाकरे जर संपले असतील तर मग विश्वगुरु असणारे पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरेंवर का बोलावे लागतेय. तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसत आहे. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. मात्र, माझे त्यांना आव्हान आहे, उद्धव ठाकरेंना संपून दाखवा”, असेही ते म्हणाले. दरम्यान, ही सभा संपल्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी बोईसर ते वांद्रे असा प्रवास केला.