लंडन – भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात मोईन अली याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अष्टपैलू बेन स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे तसेच संघात ख्रिस वोक्सही नसल्याने इंग्लंड संघात अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवणार आहे, असे मत प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी व्यक्त केले होते. त्यामुळेच इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने मोईन अलीला संधी देण्याचे संकेत दिले होते.
मोईन अली भारताविरुद्ध सातत्याने यशस्वी ठरला आहे. त्यातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही त्याची गोलंदाजी सातत्याने त्रासदायक ठरलेली असल्याने त्याचा समावेश निश्चित मानला जात आहे.