बारामती – जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागील दोन वर्षांपासून प्रतिपूर्ती शुल्काचा परतावा मिळाला नसल्याने शाळा अडचणी आल्या आहेत. त्यामुळे मागील शुल्काचा परतावा न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा संस्थाचालकांच्या वतीने घेण्यात आला आहे
बारामती येथे जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी संस्थाचालकांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सतीश सांगळे यांनी दिली.
शाळांना प्रतिपूर्ती शुल्कबाबत एक वर्षाच्या आत परतावा देणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाकडून 2017 /18 ची पन्नास टक्के रक्कम बाकी आहे, असे सांगण्यात आले आहे.