पुणे – रस्त्यावर लांबून दिसणाऱ्या पट्ट्यांमुळे वाहनांचा वेग कमी होण्यासह नागरिकांना सहज रस्ता ओलांडता यावा, या हेतूने शहरांत “थ्री डी’ झेब्रा क्रॉसिंग आखण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र “थ्रीडी’ झेब्रा क्रॉसिंग रस्त्यावर दिसणे दूरच असताना, प्रायोगिक तत्त्वावर आखलेल्या “थ्रीडी’ झेब्रा क्रॉसिंगचा रंग गायब झाला आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये वाहतूक विभागाने दिल्लीच्या धर्तीवर शहरात “थ्रीडी’ झेब्रा क्रॉसिंग आखण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर सुरुवातीला येरवडा येथील वाहतूक शाखेच्या मुख्यालयात वाहतूक पोलिसांनी आणि नंतर बीएमसीसीच्या समोर पालिकेकडून “थ्रीडी’ झेब्रा क्रॉसिंगची आखणी केली. शहरात आणखी 25 ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग प्रस्तावित असूनही, पालिकेचे मात्र “प्रायोगिक’ झेब्रा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष होत आहे.
2सुमारे तीन महिन्यांपूर्वी याची आखणी केली, मात्र काही महिन्यांमध्येच बीएमसीसीच्या समोरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे फिकट झाले आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये प्रभावी वाटणाऱ्या या झेब्रा क्रॉसिंगचा “थ्रीडी इफेक्ट’ मात्र दिसेनासा झाला आहे.
32
त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावरील “थ्रीडी’चा अभ्यास न करताच वाहतूक पोलीस आणि पालिका आणखी 25 चौकांसाठी आग्रही असल्याने, कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.