#IrevEng : इंग्लंडचा आयर्लंडवर सहज विजय

डबलिन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला पहिला सामना खेळणारा इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स याच्या नाबाद 61 आणि टॉम कुरेन याच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर शुक्रवारी झालेल्या एकमेव एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने आयर्लंडवर 4 गडी राखून विजय संपादित केला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. टॉम कुरेन आणि लियाम प्लंकेट यांच्या प्रभावी गोलंदजीसमोर आयर्लंडसंघाला 43.1 षटकांत सर्वबाद 198 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. टॉम कुरेन याने 8.1 षटकात 35 धावा देत 3 तर लियाम प्लंकेटने 7 षटकात 35 धावा देत 4 गडी बाद केले. आयर्लंडकडून फलंदाजीत पाॅल स्टर्लिंगने सर्वाधिक 33 धावा केल्या, तर मार्क अदएयरने 32 आणि अँडी बॅल्बीर्नीने 29 धावा केल्या.

विजयासाठीचे 199 धावांचे लक्ष इंग्लंडने अवघ्या 42 षटकांत 6 बाद 199 धावा करत पूर्ण केले. इंग्लंडकडून बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद 61 धावा आणि टाॅम कुरेनने नाबाद 47 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इयोन माॅर्गन शून्यावर बाद झाला. आयर्लंडकडून जोशुआ लिटलने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.