#RCBvSRH : बाद फेरीसाठी हैदराबाद प्रयत्नशील

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Vs सनरायजर्स हैदराबाद
वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळुरू

बंगळुरू – आयपीएलचा मोसम शेवटाकडे आला असून अद्याप बाद फेरीतील चौथा संघ ठरलेला नसून या स्थानासाठी सध्या तरी हैदराबाद, कोलकाता आणि पंजाब यांच्यात चुरस असून सनरायजर्स हैदराबादकडे बाद फेरीत आपले स्थान पक्‍के करण्याची आज शेवटची संधी असून त्यांच्या समोर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या बंगळुरूच्या संघाचे आव्हान असणार आहे.

सनरायजर्स हैदराबदाचा संघ यंदाच्या मोसमात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही प्रकारात समतोल असूनही त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याने ते सध्या क्रमवारीत चौथ्या स्थानी असून सध्या त्यांच्या खात्यात 12 गुण आहेत. त्यामुळे त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळाल्यास त्यांचे 14 गुण होतील आणि ते प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्‍यता आधिक बळावेल.

मात्र, आजच्या सामन्यात त्यांना बंगळुरूचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. तेंव्हाच त्यांना सरासरीच्या बळावर प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी प्राप्त होईल. सध्या हैदराबादच्या संघाकडे त्यांचे दोन्ही धमाकेदार सलामीवीर उपलब्ध नाहीत. ज्यात यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो यांचा समावेश आहे. त्यामुळे गत सामन्यात हैदराबादच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

सध्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी सलामीची जबाबदारी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलकडे असून त्याच्या साथीला यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा हा सलामीला येतो आहे. त्याचबरोबर बेअरस्ट्रोच्या जागी संघात मोहम्मद नबीला संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे उयंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्टात आले असून विजय अथवा पराभव या दोन्हीने त्यांच्या संघाला कोणताही फरक पडणार नसला तरी सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागणाऱ्या विराट कोहलीच्या संघाला निदान स्पर्धेतील शेवट तरी गोड करावा यासाठी आजचा सामना जिंकणे आवश्‍यक असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरूचा संघही हैदराबादच्या संघाइतकाच विजयासाठी प्रयत्नशील
असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.