#ENGvPAK : इंग्लंडचा पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय

ब्रिस्टल – सलामीवीर जाॅनी बेयर्सटोच्या शतकी आणि जेसन राॅयच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शतकी खेळी करणारा जाॅनी बेयर्सटो हा सामनावीर ठरला.

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तान ला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 385 धावा उभारल्या. पाकिस्तानकडून फलंदाजीत सलामीवीर इमाम-उल-हकने 131 चेंडूत सर्वाधिक 151 धावा केल्या, तर आसिफ अलीने 52 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक 4 तर टाॅम कुर्रन याने 2 गडी बाद केले.

विजयासाठीचे 359 धावांचे आव्हान इंग्लंडने अवघ्या 44.5 षटकांत 4 बाद 359 धावा करत सहज पूर्ण केले. इंग्लंडकडून सलामीवीर जाॅनी बेयर्सटो आणि जेसन रा्ॅय यांनी पहिल्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. जाॅनी बेयर्सटोने 93 चेंडूत 128 तर जेसन राॅय़ने 55 चेंडूत 76 धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजीत जुनैद खान, इमाद वसीम आणि फहीम अशरफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी आघाडी घेतली असून तिसरा सामना शुक्रवारी ( 17 मे ) ट्रेन्ट ब्रिज येथे होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.