डर्बन : टाॅम करन आणि क्रिस जाॅर्डन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुस-या टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
ENG LEVEL THE SERIES 😱
This Blockbuster of match comes to an end 📺
Entertainment value ☑️
Passion ☑️
Pride ☑️
🏴 level the series in Durban to 1-1
All to play for on Sunday at a SOLD OUT @SuperSportPark
See you there 😜#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/bzci5sOdSG
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 14, 2020
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या २०४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघास २० षटकांत ७ बाद २०२ धावांच करता आल्या आणि अवघ्या २ धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी काॅकने २२ चेंडूत (२ चौकार व ८ षटकार) ६५ आणि रैसी वैन डर डुसेन याने २६ चेंडूत (२ चौकार व ३ षटकार) नाबाद ४३ धावांची खेळी केली, पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. याशिवाय टेम्बा बमुवाने ३१(२९), ड्वेन प्रीटोरियसने २५(१३), डेविड मिलरने २१(१६) धावा केल्या.
इंग्लंडकडून मार्क वूड, क्रिस जाॅर्डन, टाॅम करनने प्रत्येकी २ तर बेन स्टोक्सने १ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर इंग्लंडने बेन स्टोक्सच्या ४७(३०), मोईन अलीच्या ३९(११), जाॅनी बेयर्सटोच्या ३५(१७), जेसन राॅयच्या ४०(२९) आणि इयोन माॅर्गनच्या २७(२४) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ७ बाद २०४ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडीने ४ षटकांत ४८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर एंडिल फेहलुकवायोने ४ षटकात ४७ धावा देत २, तरबेंज शम्सी आणि ड्वेन प्रीटोरियसने प्रत्येकी १ गडी बाद केला.