प्रमुख खेळाडूंना विश्रांती
लंडन – पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंडने आपला 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला. संघातून प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून डेव्हिड विली याने संघात पुनरागमन केले आहे. येत्या 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत ही मालिका होणार आहे.
इंग्लंडचा संघ – इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम बॅंटन, सॅम बिलींग्ज, टॉम करन, जो डेन्ली, ल्युईस ग्रेगोरी, ख्रिस जॉर्डन, साकीब महमूद, डेव्हिड मलान, आदिल रशिद, जेसन रॉय, डेव्हिड विली. राखीव खेळाडू – पॅट ब्राऊन, लिआम लिव्हींगस्टोन, रिस टोप्ले.