पुरंदर व हवेली तालुक्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, या प्रमुख उद्देशाने 2008 मध्ये काशी विश्वेश्वर बचत गटाची स्थापना करीत राजवर्धिनीताई संजय जगताप यांनी ग्रामीण भागातील महिलांचे संघटन सुरू केले. ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून राजवर्धिनी जगताप यांनी विधायक आणि रचनात्मक कामांचा पाया रचला आहे. त्यामुळे महिला आणि ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली आहे.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार, रोजगाराच्या नवीन संधी, प्रशिक्षण, आवश्यक मदत आदींची जबाबदारी राजवर्धिनीताई यांनी स्वीकारली. उन्हाळी कामे, आंबा महोत्सव, दरवर्षी 40 हजार किलो दिवाळीच्या फराळाचे उत्पादन, आईस्क्रिम पार्लर, आदींतून महिलांना आर्थिक लाभ मिळू लागला.
अल्पवधीत हजारो महिला राजवर्धिनीताई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहेत. महिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी 2012 मध्ये ग्रामीण ही संस्था (ठअचखछ:र् ीीे ठिेश्रश अलींर्ळींळीूं षीे चरहळश्रर खपींशीवशशिपवशपीं छशीुींज्ञ) सुरू केली. ही नोंदणीकृत संस्था महिलांसाठी आरोग्य शिबीर, औषधोपचारासाठी कार्यरत आहेत. संस्थेच्या पुरंदर- हवेली परिसरातील 18 हजार महिला सभासद आहेत. 18 रुग्णालयांच्या माध्यमातून हे विधायक कार्य 8 वर्षापासून सुरू आहे.
करोना साथीत आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा व आशा स्वयंसेविकांसाठी 300 पीपीई किट, 1500 मास्क देण्यात आले. आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, प्रशासकीय कार्यालयासाठी 15 हजार 500 लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. महिलांकडून 12 हजार कापडी मास्क बनवून ते गरजूंना दिले. 2700 गरजू कुटुंबाना किराणा किट, 12 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून एकूण 10 लाखांहून गरजूंना आनंदी थाळी व दररोज 5 हजार लिटर आनंदी दूध दिले.
अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे 8 हजार कुटुंबाना वाटप केले. दोन महिने डॉक्टरांना बायटॅप व्हेंटिलेटर मशिन व 4 थर्मल गन दिल्या आहेत. परराज्यातील मजुरांची वैद्यकीय चाचणी केली. त्यांचे यशस्वी उद्योजिका म्हणून योगदान आहे. सिल्व्हर ज्युबली मोटर्स कंपनीची व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. महिंद्रा कंपनीची डिलरशिप सिल्व्हर ज्युबलीकडे आहे. महिंद्राची डिलरशीप सांभाळणाऱ्या पश्चिम भागातील त्या एकमेव महिला आहेत. महिंद्रा सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापन स्वत: पाहतात. संत सोपानकाका सहकारी बॅंकेच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत.
सहकार, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात पुरंदरची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकार महर्षी (स्व) चंदुकाका जगताप यांच्या त्या सुनबाई आहेत. राजवर्धिनींना माहेरचा समाजसेवेचा वारसा आहे. (कै) रंगनाथमामा मोगल व निफाडचे माजी आमदार मालोजीराजे तथा काकासाहेब मोगल यांची नात आहेत. त्यांचे वडिल राजेंद्र मोगल यांनाही समाजसेवेची आवड आहे. उच्चशिक्षित असून आमदार संजय जगताप यांच्या त्या पत्नी आहेत.
त्यांनी कार्यकर्तृत्वातून स्वत:च वेगळेपण जपले आहेत. आपल्या आईवडिलांसाठी प्रसंगी त्यांचा मुलगा, सासरी कर्तव्यदक्ष सून, समाजकार्य मग्न आमदार श्री. संजय जगताप यांच्या पत्नी व मास्टर समरादित्य यांचे संगोपन करणारी प्रेमळ आई अशा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळ्या भूमिका सुद्धा त्या चोख पार पाडत आहेत. राजवर्धिनीताई सुद्धा सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाला परिस्थितीशी लढायला
शिकवत आहेत.
शब्दांकन : अमोल बनकर, सासवड