मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव समोर आलं आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकाची चौकशी करण्यात आली होती, मात्र या प्रकरणात क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीच्या अधिकऱ्यानी माहिती दिली आहे.
यातच ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर ती सोशल मीडियापासून दूरच राहिली. ड्रग्ज प्रकरणात चौकशी झाल्यानंतर दीपिका पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे, तिची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होते आहे.
या पोस्टमध्ये प्रभासचा फोटो शेअर करत तिनं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने म्हटलं, प्रिया प्रभास, तू नेहमी आनंदी आणि निरोगी राहा. येणारं वर्ष तुझ्यासाठी खूप चांगलं असेल, अशी आशा आहे. दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेता प्रभासचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे अभिनेत्री दीपिकासह सारा अली खान,आणि श्रद्धा कपूर , रकूल प्रित सिंह नाव समोर आलं आहे.