नगर – मनमाड महामार्गावरील कॉटेज कॉर्नरवर सीना नदीवरील पुलाच्या अलिकडील बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने उंच स्पीड ब्रेकर टाकले आहेत. या महामार्गावरील हे धोक्याचे वळण असल्याने येथे दोन्ही बाजूने स्पीड ब्रेकर आवश्यक आहेत.
मात्र, त्यावर रिप्लेक्टरचे पांढरे आडवे पट्टे मारले नसल्याने अनेकदा वाहनचालक या स्पीड ब्रेकरवर वाहनांसह जोराने आदळतात. काही दुचाकीधारकांना तोल सांभाळता आल्याने कित्येकदा पडून जखमी झाले आहेत. त्यातच मागील बाजूने मोठे वाहन आले, तर दुचाकीधारक गडबडून जातो.
या स्पीड ब्रेकरवर आडवे पांडरे पट्टे नसल्याने चालकांना या स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नाही. याबाबत या भागातील नागरिकांसह सामाजिक संघटनांनी व वाहनचालक-मालक संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने दिली आहेत. या वळणावरील स्पीड ब्रेकरवर तातडीने आडवे पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.