कोल्हापूर – लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करा या मागणी करत वीज बिल भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा कृती समितीने घेतला आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई न केल्याबद्दल आज वीज बिल भरणार नाही अशा इशारा देत कृती समितीच्या वतीने मिरजकर तिकटी येथे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावा या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने लढाई सुरू आहे. याबाबत शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला निवेदने देखील दिली आहेत. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या कोल्हापूरकरांनी आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत लॉकडाउन काळातील वीज बिल माफ होणार नाही तोपर्यंत उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.