#व्हिडीओ : रोषणाई, आकर्षक सजावट ठरताहेत मिरवणुकीचे खास आकर्षण

– रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर – शहरात मोठ्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुक जोशात निघाल्या असून सुमारे वीस मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला.

एसटी स्टँडवरील हुतात्मा राजगुरु स्मृतीशिल्प मधील हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सव्वा सहाच्या दरम्यान मानाचा मोती चौक गणपतीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात झाली. विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट हे विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण होते. तर पोलिसांच्या वतीने डीजे डॉल्बीवर कडक निर्बंध टाकल्याने कमी आवाजात मिरवणुका निघाल्या. ढोलताशा पथकांना यावेळी मंडळांनी प्राधान्य दिले. विसर्जन मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)