अग्निशामक दलच विघ्नहर्ता ; ८ जणांना बुडतांना दिले जीवदान

विसर्जनदारम्यान पाय घसरून पडली होती पाण्यात

पुणे – सध्या पुण्यात गणपती विसर्जनाची सर्वत्रच धामधूम आहे मात्र या विसार्जंदरम्यान काही अनुचित प्रकार घडले आहेत. अशीच एक घटना औंध मध्ये घडली आहे. विसर्जन घाटावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना पाय घसरल्याने 14 वर्षीय मुलगी पाण्यात बुडाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु घटनास्थळी उपस्थित असणारे प्रभारी अग्निशमन अधिकारी कमलेश सनगाळे यांनी तिला बुडता बुडता वाचवले आहे. तसेच याच ठिकाणी आणखी एका 54 वर्षीय व्यक्तीला बुडताना चंद्रकांत बुरुड यांनी वाचविले आहे. दरम्यान विसर्जनदारम्यान सलग घडणाऱ्या या घटनांमधे अग्निशमन दलाने 8 जणांना बुडता बुडता वाचवून एक प्रकारे जीवदानच दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)