मानाच्या ‘पाच’ही गणपतींचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन

पुणे – दहा दिवस आपल्या लाडक्‍या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज शहरातील पाच ही मानाच्या गणपतीचे (गुरुवार) ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन झाले. यावेळी मनाच्या पहिलय ‘कसबा गणपती’चे ४ वाजून ३१ मिनिटांनी डेक्कन येथील पतंगाघाटावर विसर्जन झाले. तर मानाच्या दुसऱ्या ‘तांबडी जोगेश्वरी’ गणपतीचे विसर्जन हे ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले. मानाचा तिसरा ‘गुरूजी तालिम गणपती’चे ५ वाजून ५२ मिनिटांनी विसर्जन झाले. गुरूजी तालिम गणपतीच्या मिरवणूकी दरम्यान ‘हरे कृष्णा’ रथ साकारला होता.

तसेच, मानाच्या चौथ्या ‘तुळशी बाग गणपती’चे ६ वाजून १० मिनिटांनी विसर्जन झाले. यावेळी 22 फूट उंचीच्या फुलांनी सजविलेल्या “मयुरासना’वर “गणराय’ विराजमान झाले होते. मानाच्या पाचव्या ‘केसरीवाडा गणपती’चे ५ वाजून २८ मिनिटांनी झाले. यावेळी पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप देण्यात आला. फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींची मुर्ती विराजमान झाली होती.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)