पुणे – जानेवारी-डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 157 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दि.16 ऑक्टोबरपासून भरण्यास सुरुवात होणार आहे. तर, मतदान 5 नोव्हेंबर, रोजी तर मतमोजणी दि. 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारी घेता येणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी 25 ऑक्टोबरलाच जाहीर केली जाणार आहे.
तालुकानिहाय ग्रा.पं. निवडणुका आणि पोटनिवडणुका आंबेगाव- 30-14, बारामती 32-0, भोर -27,19, दौंड-11-5, हवेली -3,10, इंदापूर -6-8, जुन्नर-26-15, खेड-25-21, मावळ-19-11, मुळशी -23-14, पुरंदर-15-7, शिरुर-8-8, वेल्हे-6-25