जागा 6, राजकीय पक्ष 299

देशाची राजधानी दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. इतर राज्यांच्या तुलनेने जागांची संख्या कमी असली तरी अनेकांना वाचून धक्‍का बसेल की इथे या सात जागांसाठी 299 राजकीय पक्षांचे राजकारण चालते. निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेले अनेक पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवत नाहीत.

यंदाही दिल्लीतील रणांगणामध्ये भाजपा, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्येच टक्‍कर आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिल्लीमध्ये पाच राष्ट्रीय पक्षांनी शिरकाव केला. मात्र, दिल्लीमध्ये सात राष्ट्रीय पक्ष नोंदणीकृत आहेत. एक प्रादेशिक पक्ष आणि अन्य स्थानिक पक्ष नोंदणीकृत आहेत. इतक्‍या अमाप संख्येने नोंदणीकृत पक्ष असूनही स्थानिक निवडणुका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांपासून हे पक्ष स्वतःला दूरच ठेवतात.

1951 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ सहा पक्षांनी सहभाग घेतला होता. दिल्लीतील लोकसभेच्या चार जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात उतरले होते. 1957 च्या निवडणुकांमध्ये पाच पक्ष रिंगणात होते, तर उमेदवारांची संख्या 30 होती. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांतही राजकीय पक्षांची संख्या पाचच राहिली; पण उमेदवारांची संख्या घटून 28 झाली.

साधारण नव्वदीच्या दशकापासून उमेदवार वाढण्यास सुरुवात झाली. 1991 च्या निवडणुकांमध्ये 36 नोंदणीकृत पक्षांनी सहभाग घेतला. यावेळी उमेदवारांचा आकडा होता 502. यामध्ये 399 उमेदवार अपक्ष होते. 1996 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 50 राजकीय पक्षांनी जवळपास 523 उमेदवार रिंगणात उतरवले. 1998 मध्ये ही संख्या घटून 35 वर आली, तर उमेदवारांची संख्याही 132 वर आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.