पुणे – अबब…’नो हेल्मेट’चा दंड 18,500रु.

पुणे – वाहतूक पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये सीसीटीव्हीचा वापर वाढविला असून त्याद्वारे थेट वाहनचालकांवर कारवाई होत आहे. याचे आणखी एक उदाहरण समोर आले असून एका वाहनचालकाने हेल्मेट न वापरल्यामुळे त्याला तब्बल 18 हजार 500 रुपयांचा दंड आकारला आहे. संबंधित वाहनचालक सुमारे 37 वेळा विनाहेल्मेट असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आला.

दि.1 जानेवारीपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांत वाहतूक शाखेने या नियमाची अंमलबजावणी करताना कोट्यवधी रुपयांच्या रकमेची दंडाची कारवाई केली आहे. परंतु हा दंड भरण्याकडे अनेक वाहनचालक दुर्लक्ष करत आहेत.

वाहतूक पोलिसांनी आता हेल्मेटसक्तीच्या कारवाईसाठी आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईवर भर दिला आहे. यासंदर्भात वाहनचालकांवर करण्यात आलेल्या कारवाईची पोलिसांनी यादी तयार केली आहे. यानुसार “त्या’ वाहनचालकांच्या घरी नोटीस पाठवण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांनी “टॉप 100′ वाहनचालकांची यादी तयार केली आहे. यानुसार एका वाहनचालकाला तब्बल 18 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय जास्तीतजास्त दंड झालेल्या या पहिल्या शंभर वाहनचालकांमध्ये जवळपास 5 हजार रुपये दंड झालेले शेवटच्या काही स्थानांवर आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.